ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक २० हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्ये होती या बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. तीन अपत्या बाबत तुम्ही अपात्र होणार नाही असा चांगला अहवाल तयार करून देतो असे सांगून ३० हजारांची लाच मागितली होती.
यातील तकरारदार हे पन्नास वर्षीय असुन ते ग्रामपंचायत
निवडणुकीत २०२१ मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तिन अपत्य बाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता. सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील लिपिक महेश वानखेडे यांचेकडे पेडींग होते. त्यानंतर तक्रारदार हे महेश वानखेडे यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता वानखेडे यांनी तक्रारदार यांना सांगितले कि तुमचा तिन अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो त्यासाठी मला ३०,००० /- रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.९/०३/२९२४ शनिवार रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली .
तक्रारी प्रमाणे लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने आज दि. ९ मार्च शनिवार रोजी लिपिक वानखेडे यांनी सांगितल्याने लिपिक समाधान लोटन पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात २०,०००/- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या बाबत महेश रमेशराव वानखेडे, वय ३० , व्यवसाय नोकरी, लिपीक ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय,जळगांव. जि.जळगांव, मुळ रा. नेर ता. नेर जि. यवतमाळ, व समाधान लोटन पवार, वय ३५ वर्ष , व्यवसाय नोकरी, लिपीक, ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव जि. जळगांव रा. लालबाग कॉलणी. पारोळा ता. पारोळा जि. जळगांव त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन ता. जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर,राकेश दुसाने प्रदीप पोळ यांनी सापळा यशस्वी केला