भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

अधिकाऱ्यांच्या नावाने १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या खाजगी महिलेस अटक

जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्या करिता म्हशी विकत घेण्याकरिता कर्ज मिळण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात एका तक्रारदराने अर्ज केला होता. त्यासाठी एक खाजगी महिलेने तेथील अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रारदाराला ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता १० हजार रुपये स्वीकारताना त्यांना बुधवार दि. १३ मार्च रोजी दुपारी लाच धुळे विभागाच्या लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले .

तकारदार यांची रावेर तालुक्यातील मौजे पुरी, येथे वडीलांच्या नांवे वडीलोपार्जित बागायत शेत जमीन असुन त्यांना सदर शेत जमीनीमध्ये दुग्ध व्यवसाय सुरु करायचा असल्याने म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज मिळण्याकरीता ते ८/१० दिवसापुर्वी जिल्हा उदयोग केंद्र, जळगांव कार्यालयात गेले होते. तेथे हजर असलेल्या संशयित आरोपी विदया परेश शाह (खाजगी महिला) यांनी तक्रारदार यांना त्यांची जळगांव कार्यालयातील अधिकारी यांचेशी ओळख असल्याचे भासवून रूपये तीस हजाराची मागणी केली.

या बाबत तक्रारदाराने दि. १२ मार्च रोजी धुळे एसीबी कडे तक्रार केली त्या नंतर आज बुधवार दि. १३ मार्च रोजी दुपारी रोजी सापळा रचण्यात येऊन दुपारी ०२:१५ वाजेच्या सुमारास सदर लाचेची रक्कम जिल्हा उदयोग केंद्र, जळगांव कार्यालयात विदया परेश शाह या खजगी महिलेला स्वतः रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, कविता गांगुर्डे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!