बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने लांबविले !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील नूतन वर्षा कॉलनीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे घटना उघडकीस आली आहे.
नूतन वर्षा कॉलनी मधील रहिवासी श्रुती श्रीकृष्ण मुजुमदार (वय-६०) हे १२ मार्च रोजी त्या घर बंद करून कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घर बंद पाहून चोरीची संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीच्या मुर्त्या व शिक्के आणि १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
२१ मार्च रोजी सकाळी १० वाजता त्या घरी आल्यावरसदरील चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला यासंदर्भात गुरुवार ३१ मार्च रोजी रात्री त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.