भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जळगाव महापालिकेत सत्तांतर होण्याच्या चर्चेला बळ :राजकीय वर्तुळात खळबळ !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी): ऐन महापौर पदाची  निवडणूक तोंडावर आली असतांना सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेत शिवसेनेशी संपर्क साधल्याची माहिती समोर आल्याने महापालिकेतील भाजपची सत्ता बदल करण्यासाठी शिवसेने फासे टाकले असून त्यांच्या गळाला २० पेक्षा जास्त नगरसेवक लागल्याची चर्चा आहे. या मुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही शिवसेनेला साथ दिल्याचे समजत असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, सेनेचे संजय सावंत हे या खेळीचा भाग असल्याची चर्चा आहे. खडसे समर्थक सदस्यांसह गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळेंवर नाराज सदस्य शिवसेनेकडे येण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात असून जळगावमध्ये १८ मार्च रोजी महापौर व उपमहापौरांची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून जळगाव महापालिकेत हालचाली सुरु आहेत. भाजपकडून विद्यमान महापौर भारती सोनवणेंनी मुदतवाढीसाठी तर अन्य दोघांनी या पदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर शिवसेनेकडूनही जोरदार तयारी केल्याचे समजते. 

भाजपमधून महापौरपदासाठी उमेदवाराची निवड आज होणार होती. मात्र, त्याआधीच काही सदस्य नॉट रिचेबल असल्याची चर्चा सायंकाळी सुरु झाली. त्यामुळे ही निवड झाली नाही. भाजपचे २० हून अधिक सदस्य संपर्कात असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांकडून समजते. हे सर्वजण मुंबईत गेल्याचे समजते. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी महापौर निवड बिनविरोध होऊ देणार नाही, असे संकेत यापूर्वीच दिले होते. भाजपचे सदस्य गायब झालेले असतानाच शिवसेनेने आजच महापौरपदाचा उमेदवार ठरवला आहे. जयश्री सुनील महाजन या महापौरपदाच्या तर उपमहापौर पदासाठी भाजपमधून येणाऱ्या कुलभूषण पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेने सांगली पॅटर्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राबविल्याची जोरदार चर्चा रंगली असून त्यामुळे भाजप ची डोखेदुखी वाढली आहेत. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!