भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचे, जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा इशारा

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। पुढील दोन दिवस गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे

२३ नोव्हेंबरनंतर बाष्पयुक्त वारे राज्यात येणार आहेत, तर, २४ नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी राज्यभरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

जळगाव जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२३ या कालावधी दरम्यान मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तसंच तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!