भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

दिवाळी गोड होण्यासाठीची मुख्यमंत्र्यांची “ही” घोषणा हवेतच विरणार?

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सामान्य जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी स्वस्त धान्य दुकानामधून एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ अशा चार वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

तरीही अद्याप स्वस्त धान्य दुकानामध्ये या चार वस्तूंचे पॅकेट उपलब्ध झाले नाही. नागरिकांना दुकानामध्ये जाऊन माघारी फिरण्याची वेळ येत आहे. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ कागदावरच होती का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वस्त धान्य दुकानामधून एक लिटर पाम तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ अशा चार वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेने सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून देखील स्वस्त धान्य दुकानामध्ये अद्याप चारही वस्तूंचे पॅकेट उपलब्ध झालेले नाही. दुकानदाराशी संपर्क साधला असता, अजून तीन ते चार दिवसानंतर पॅकेट उपलब्ध होतील असे सांगितले जाते. त्यानंतर दिवाळीस केवळ चार ते पाच दिवस शिल्लक राहतील. मग इतक्या कमी वेळेमध्ये नागरिक कसे फराळ तयार करणार, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना जर खरेच सामान्य नागरिकांची दिवाळी गोड करावयाची होती, तर घोषणा होताच दोन ते तीन दिवसात अशा प्रकारचे पॅकेट प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक होते.

त्यामुळे नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामधील बहुतांशी नागरिकांनी त्या पॅकेजच्या भरवशावर न राहता कर्ज काढून का होईना, दिवाळी फराळाचे साहित्य किराणा दुकानामधून खरेदी करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही घोषणा यापुढेही घोषणाच राहते की मग येणाऱ्या दोन-तीन दिवसामध्ये हे पॅकेट उपलब्ध होता, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!