एक लाखाची लाच स्वीकारताना वायरमनला रंगेहात अटक,एसीबी ची कारवाई
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। नवीन बांधकाम झालेल्या घरात वीज मीटर नसतांना देखील वीज वापर केल्याप्रकरणी महावितरणाकडून दंडाची नोटीस देण्यात आली होती . प्रकरण मिटवण्यासाठी १ लाखांची लाच स्विकारताना जळगाव शहरात प्रशांत विकास जगताप,वय ३३ या कंत्राटी वायरमनला एसीबी पथकाने रात्री अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर वृट असे की , जळगाव शहरातील एका ५३ वर्षीय तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाल्याने घराला वीज मीटर बसवून मिळावे म्हणून महावीआतरांकडे अर्ज केला होता. परंतु घराला मीटर नसतांना देखील वीज वापरत असल्याच्या कारणाने महावितरणाकडून भरारी पथकाने भेट दिल्यावर त्यांना ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरण्याची नोतीस देण्यात आली होती. दंड भरला तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून १ लाख रुपये स्वीकारताना प्रशांत विकास जगताप वय ३३ याला रंगेहात पकडण्यात आले आहे.प्रशांत विकास जगताप यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई पथकात पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि अमोल वालझाडे, सफौ दिनेशसिंग पाटील, पोना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळू मराठे, पोशी.राकेश दुसाने यांनी सापळा लावला. तर पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पोशी अमोल सूर्यवंशी, पोशी सचिन चाटे यांच्या पथकाने सहकार्य केले.