खोटा प्लॉट दाखवून बनावट सौदापावती करून महिलेची १० लाखात फसवणूक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव शहरातील मोहाडी येथे खोटा प्लॉट दाखवून तसेच बनावट सौदापावती करून वरणगाव येथील महिलेची १० लाख २१ हजारात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आतिष रतनलाल राणा, संजू शिवराज परदेशी, अरविंद यवशंत बाऊस्कर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ सप्टेंबर २०१९ रोजी व दि. ३० जून २०२० रोजी मोहाडी जळगाव येथे संमगनत करुन जगरानीबाई अमृतला मुराई ,वय ६५, प्लॉट नं २७, गणेशनगर, वरणगाव ता. भुसावळ यांचा आतिष रतनलाल राणा, संजू शिवराज परदेशी, अरविंद यवशंत बाऊस्कर या तिघांनी विश्वास संपादन करुन बनावट सौदापावती केली. प्लॉट अस्तित्वात नसताना खोटा प्लॉट दाखवून बनावट दस्तऐवज करुन नोटरी बनवुन जगरानीबाई मुराई यांची १० लाख २१ हजारात फसवणूक करून अपहार केला आहे. याप्रकरणी जगरानीबाई मुराई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहेत.