भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

तलाठ्यासह महिला कोतवाल रंगेहात लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

जाळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सातबारा उतार्‍यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भडगाव तालुक्यातील भोरटेक बुll तलाठी कार्यालयात आज सुटीच्या दिवशीही तलाठ्यासह महिला कोतवालाला एसीबीने रंगेहात अटक केली.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची वडीलोपार्जित शेतजमिन भोरटेक बुll ता.भडगाव तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झालेले आहेत.सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर स्वतः तक्रारदार यांचे व सोबत ईतर ०९ असे एकुण १० वारसांची नावे लावणे व तशी नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी व कोतवाल यांनी २५००/रु.लाच रकमेची मागणी केलेली होती त्यापैकी दिनांक-११/०४/२०२३ रोजी तलाठी यांनी तक्रारदाराकडून जागेवरच १,०००/- रुपये घेतलेले होते व उर्वरीत रक्कम १५००/-रुपये लाच रकमेची मागणी करीत असले बाबत तक्रारदाराच्या तक्रारीवरून भडगाव तालुक्यातील भोरटेक बुll तलाठी तलाठी कार्यालयात
सलीम अकबर तडवी ,वय-४४ वर्ष, तलाठी, सजा निंभोरा व प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बु ll, तलाठी कार्यालय ता.भडगाव, कविता नंदु सोनवणे ,वय-२७ वर्ष, महिला कोतवाल, मौजे भोरटेक बुll तलाठी कार्यालय ता.भडगाव, रा.तांदलवाडी, ता.भडगाव, याना आज सुटी असतानाही आज दुपारी सातबारा उतार्‍यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच
घेताना तलाठी सलीम तडवी व कोतवाल कविता सोनवणे या दोघांना एसीबीने ताब्यात घेत जळगाव एसीबीने रंगेहात
अटक केली, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सफौ दिनेशसिंग पाटील, सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहिरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना जनार्दन चौधरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉ प्रदिप पोळ , पोकॉ सचिन चाटे, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी केली असून या बाबत भडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!