भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

दहा दिवसापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

जळगाव, प्रतिनिधी: शहरातील एका युवकाशी दहा दिवसापूर्वीच विवाह संपन्न झालेल्या नवंविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजलेले नसून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील न्हावी येथील माहेर असलेली करीना सागर निकम (वय १९) रा. रमाबाई नगर, दांडेकर नगर, दूध फेडरेशनजवळ तिचा ११ जुलै २०२१ रोजी सागर राजू निकम याच्याशी नुकताच १० दिवसांपूर्वी रमाबाई नगर येथे विवाह झाला होता. करीना सागर निकम हीने आज सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास घरात कोणीच नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी सासरे राजू निकम, पती सागर निकम हे कामावर गेले होते. दिर नागेश निकम घरात झोपलेला होता.सासुबाई निर्मलाबाई निकम बाहेर होत्या.अशी माहिती मिळत आहे.याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून शहर पोलीस पुढील तपास करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!