तक्रार करूनही महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आरटीओ कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) एका कर्मचाऱ्याने दिनांक 12 नोव्हेंबर रोजी एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती मात्र आठ दिवस उलटून गेल्यावरही संबंधित ‘त्या ‘ RTO कर्मचाऱ्यावर कारवाईचं पुढे काय असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव आरटीओ कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने 12 नोव्हेंबर रोजी महाबळ परिसरात एक महिला दुकानावर आली असता तेथे कार मध्ये थांबून असलेल्या या कर्मचाऱ्याने कार मध्ये बसा… मी सोडतो असे म्हणाला यावेळी महिलेने नकार दिला, तरीही त्या कर्मचाऱ्याने पाठलाग करून लज्जा वाटेल असा प्रकार केल्याचे महिलेने नमूद केले आहे. सदर महिलेने तक्रार करून आठ दिवस उलटून गेले तरी देखील अद्याप कुठलीच चौकशी अथवा कारवाई झालेली नाही त्यामुळे ‘त्या’ कर्मचाऱ्यांची चौकशी व कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.