मोठी बातमी; मोठे संकट टळले ! ….तर जळगावात ऑक्सिजन अभावी मृत्यूतांडवाने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा हादरला असता…
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। गुरुवारी सायंकाळपर्यंत ऑक्सिजनचे टँकर येणे अपेक्षित असताना ते रात्री उशिरा पर्यंत पोहोचले नव्हते.जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये गुरुवारी रात्री ऑक्सिजनचा साठा संपल्याने रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.त्यातच ऑक्सिजन घेवून येणाऱ्या टँकर चालकाचा संपर्क तुटला,मात्र रुग्णालयात 100 सिलेंडरचे बॅकअप असल्याने मोठे संकट टळले.व या बॅकअप सिलेंडर वर तीन तास ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. अखेर रात्री 12 वा. ऑक्सिजन टँकर रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
२५० रुग्ण हे जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे रुग्णालयाला दररोज 8 मॅट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची आवश्यकता असते. दरम्यान मंगळवारी सोळा मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन रुग्णालयातील टँकमध्ये भरण्यात आले होते. मात्र गुरुवारी सायंकाळी हा साठा संपत आला.
आणि नियमित येणारे ऑक्सिजन टॅंकर सायंकाळपर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र धुळ्याकडून येत असलेला ऑक्सिजन टँकर चालकाचा संपर्कच तुटल्याने रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यामुळे पर्यायी व्यवस्था असलेले 100 ऑक्सीजन सिलेंडरद्वारे रुग्णांना तीन तास ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.ऑक्सिजन सिलेंडरमधून ऑक्सिजन पुरवठा सुरू असताना अखेर रात्री बारा वाजेच्या सुमारास ऑक्सिजन टँकर रुग्णालयात दाखल झाल्याने रुग्णालयाचे मोठे संकट टळले. अन्यथा..