भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

चिठ्ठीविना वेबसाईटवर ऑनलाईन औषधांची विक्री : गुन्हा दाखल !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शहरातील शिवकॉलनी येथे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना वेबसाईटवर ऑनलाईन औषधांची विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी ऑनलाईन वेबसाईटवर शहरातील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, बेकायदेशीपणे डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ‘मेशो’ या ऑनलाईन वेबसाईटसह इतर वेबसाईटवर औषधींची विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी कर्मचाऱ्यासह संबंधित प्रकाराची चौकशी केली. यादरम्यान शहरातील शिवकॉलनी येथील अमोघा हाईटस् मुंदडानगर येथील फ्लॅट क्रमांक २५ येथून ऑनलाईन औषधांची विक्री केली जात असल्याचे समोर आले. २९ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान विविध वेबसाईटवर औषधांची विक्री केल्याचे उघडकीस आले.

त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मोरे यांनी सोमवार, २ मे रोजी याप्रकराबाबत रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मीशो ऑनलाईन पोर्टलसह इतर वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!