भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

क्रेडीट कार्ड नंबरचा वापर करून ३२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। अनोळखीनंबरवरून आलेल्या ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून दादावाडी येथे राहणाऱ्या व्यक्तीची क्रेडीट कार्ड नंबरचा वापर करून ३२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मुकेश बाळकृष्ण गुरव (वय-४१) रा. गुजराल पेट्रोल पंपजवळ, दादावाडी हे आपल्या कुटुंबियासह राहतात. ते खासगी वाहनाचे चालकाचे काम करून उदरनिर्वाह करतात. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेशेजारी कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी एका अनोळखी नंबरवरून मोबाईलवर फोन आला. आपण एसबीआय क्रेडीट कार्ड वरून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना ३२ हजार ७८६ रूपये कट होण्यासंदर्भात मॅसेज आला. त्यांनी ॲपच्या माध्यमातून आणि स्टेटमेंटच्या माध्यमातून चौकशी केली असता ३२ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यांनी तातडीन जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुकेश बाळकृष्ण गुरव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामभाऊ बडगुजर करीत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!