भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषातून अत्याचार; मुलगी गर्भवती

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील एक अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन मुलाने ठेवलेल्या संबंधातून मुलगी गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जळगाव येथील एका १७ वर्षीय पिडीत मुलीचे ऑगस्ट २०२० मध्ये मैत्रिणीच्या मार्फत पिडीत मुलीचा एका १७ वर्षीय मुलासोबत ओळख निर्माण झाली. त्यांची ओळख झाल्यानंतर दोघांचे भेट होवून बोलणे सुरू झाले. मुलाने माझ्याशी लग्न करशील का असे सांगितले असता मी लहान असल्याचे मुलीने सांगितले. ऑगस्ट २०२० च्या शेवटच्या आठवड्यात मुलाने मला महत्वाचे बोलायचे आहे, असे सांगून पिडीत मुलीला दुचाकीवर बसवून वाघ नगर परीसरातील कोल्हे हिल्स परिसरातील निर्जळ ठिकाणी नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत अंगलट केले. तिने नकार दिल्यावर भावाला मारून टाकण्याची दमदाटी केली व तिच्यावर अत्याचार केला व घरी सोडून दिले.

हा प्रकार सप्टेंबर २०२० महिन्यात ७ ते ८ वेळेस झाला. यात पिडीत मुलगी गर्भवती राहिली. याबाबत तिने मुलाला सांगितले असता पिडीतेला ठार मारण्याची धमकी देवून मला पुन्हा भेटू नको अशी धमकी दिली. त्यामुळे सदरील प्रकार पिडीतेने आई व वडीलांना सांगितला. त्यांनी ३ जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाणे गाठून पोलीसांना सर्व हकीकत सांगितली. पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात विधीसंघर्षग्रस्त मुलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!