भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, आज ४५१ कोरोना रुग्ण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। आज जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात तब्बल ४५१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात कोरोनाचे सर्वात जास्त १५९ रूग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.


आजचे रुग्ण-
जळगाव शहर-१५९, जळगाव ग्रामीण-३६, भुसावळ-५२, अमळनेर-१२, चोपडा-२१, पाचोरा-३, भडगाव-१२, धरणगाव-२०, यावल-१२, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-७, पारोळा-१८, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-३४ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ४५१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हार ७०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ९१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ३४ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८० रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!