भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावसामाजिक

पहिल्यांदाच पेट्रोलचे विक्रमी मूल्य;पेट्रोल शंभरी पार

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। सातत्याने भाव वाढत असलेल्या पेट्रोलने अखेर जळगावात शंभरी गाठली असून जिल्ह्यात पहिल्यांदा इतके विक्रमी मूल्य मोजावे लागत आहे.ही बाब सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही.

जळगाव शहरात पेट्रोलचे दर रविवारी शंभरीपार झाले. पेट्रोलचे एका लीटरचे दर १०० रुपये ४ पैसे झाले आहेत. मध्यंतरी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याचा वेग कमी झाला होता. याला पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका कारणीभूत असल्याचे मानले जात होते. या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर दरवाढ अटळ असल्याची चर्चा ही होती. आणि झाले ही तसेच, यामुळे आता जळगाव जिल्ह्यात पेट्रोलचे मूल्य शंभर रूपयांच्या पार गेले आहे.

गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे लोक आधीच समस्येने ग्रासलेले आहेत. बर्‍याच जणांचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत कमी झालेला असतांनाच आता पेट्रोल वाढीमुळे लोकांना फटका पडणार असल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आणि वाढलेल्या किंमती कमी होत नसल्याचा आधीचा अनुभव असल्यामुळे आता ग्राहकांना पेट्रोलसाठी शंभर रूपये चार पैसे मोजावे लागणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.त्या मुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!