पोलिस पाटलाचे कुटुंबांना 50 लाखाचे विमा कवच मिळावे-
पो.पा. संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव(प्रतिनिधी)। पोलीस पाटिल जिल्हा गाव कामगार संघटना पदाधिकारीं यांनी दि.२१ रोजी जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत याना भेटून पोलीस पाटिल यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले,यातील प्रमुख मागणी म्हणजे कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यु मुखी पडलेल्या पोलिस पाटलाचे कुटुंबांना रु 50लाख चे विमा कवच मिळावे,तसेच जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करून पोलीस पाटिल भवनाकरीता जागा मिळण्या बाबत मागणी केली असता साहेबांनी तत्त्वता मान्यता दिलेली असून तुम्ही सविस्तर निवेदन सादर करा,मी जळगावात नाही पण बाजूलाच लागून जागा उपलब्ध करून देईल असे आश्वासन दिले,.
त्याच प्रमाणे पोलीस पाटील कुटुंबातील सदस्यांनाही पोलिसांचे धर्तीवरच आरोग्य उपचार सुविधा मिळावी या बाबत मागणी संदर्भातही सकारात्मक चर्चा घडून आली.या वेळी जळगाव जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे,कार्याध्यक्ष अरविंद झोपे,कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील,प्रदीप तिवारी,जिल्हा महिलासंघटक शारदाताई पाटील, रुपालिताई भोलानकर, जळगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील,रावेर तालुका अध्यक्ष योगेश पाटील,धरणगाव ता.अध्यक्ष किशोर भदाणे,खापरखेडा पो.पा. संजय पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
,