जळगावात कुंटनखाण्यावर धाड : मालकीणसह दलाल महिला ताब्यात !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शहरातील नवीन सम्राट कॉलनी परिसरातील कुंटणखान्यावर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत कुंटनखाना चालवणारी महिला व दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी एका पीडित महिला मिळून आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील नवीन सम्राट कॉलनी परिसरात एक महिला स्वतःच्या घरामध्ये एका खोलीत कुंटणखाना चालवत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. यांच्या सूचनेनुसार बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचत पथकाने खातरजमा केल्यानंतर एक पंच बोलावून त्याला बनावट ग्राहक पाठवून धाड टाकण्यात आली यात घरात कुटंनखाना चालविणाऱ्या महिलेसह आणखी २ महिला मिळून आल्या. पोलिसांनी विचारपूस केली असता एक महिला कुंटनखाना मालकीण होती तर दुसरी कमिशन घेणारी दलाल महिला होती. घरातून एका पीडित महिला पोलिसांना मिळून आली आहे.
कुटंनखाण्याची मालकीण खोली वापरण्यासाठी प्रति गिऱ्हाईक पाचशे रुपये घेत होती तर गिऱ्हाईक आणून देणाऱ्या महिलेला ५०० रुपये कमिशन देत होती. सदरील कारवाई सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, महिला कर्मचारी मालती वाडीले, अर्चना पाटील, राजश्री बाविस्कर, सुनील पाटील, किरण धमके, रविंद्र मोतीराया, मीनल साकळीकर, महेश महाले पथकाने केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.