जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत सुरु असलेल्या कुंटनखान्यावर छापा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। शहरातील भुसावळ हायवे लगत असलेल्या आयोध्या नगर परिसरात सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने कुंटनखान्यावर छापा टाकला यावेळी ३ महिला, २ पुरुषांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,जळगाव शहरातील भुसावळ हायवे लगत असलेल्या अयोध्या नगर परिसरातील सुदर्शन कॉलनीत एका घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी छापा टाकला.
दरम्यान पोलिसांनी कुंटनखाना सुरू असलेल्या घरात एका बनावट ग्राहक पाठविला असता कुंटनखाना चालवीला जात असल्याची खात्री पटताच पोलीस पथकाने पंचासह त्याठिकाणी छापा टाकला. एक महिला अमोल आदिनाथ दारकुंडे रा.शिवाजी नगर, प्रशांत रतन जैन रा.अयोध्या नगर यांना ताब्यात घेतले आहे. जळगाव शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत सुरु असलेला कुंटनखाना पोलिसांनी अखेर उघडकीस आणला असून यात पोलीस अधिक तपास करीत आहेत.