मंडे टू मंडे चा दणका…. हॉटेलचे अर्धशटर ठेऊन अवैध देशी-विदेशी दारूची विक्री तूर्त बंद
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा ता.रावेर (प्रतिनिधी): येथील हॉटेलवर रात्री उशिरा पर्यंत हॉटेलला दारू विक्रीचा कुठलाही परवाना नसताना अवैध पणे देशी-विदेशी दारूची विक्री केली जात असल्याचे वृत्त मंडे टू मंडे नुकतेच प्रसिद्ध केले होते सदर वृत्ताची दाखल घेत स्थानिक प्रशासना कडून सादर अवैध दारू विक्री बंद करण्यात आली आहे,
या बाबत अधिक माहिती अशी की ,लॉक डाऊन च्या पश्वभूमीवर सर्व दुकाने पूर्णपणे बंद असे सक्त आदेश असताना सावदा शहरात बसस्थानक परिसरा जवळ बऱ्हाणपूर-अंकलेश्वर मार्गावर देशी-विदेशी दारू दुकान परिसरात रोडला लागून कुठलाही परवाना नसताना हॉटेलवर हॉटेलचे शटर अर्ध ठेऊन अवैधपणे देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री केली जाते .तसेच हॉटेलच्या मागील बाजूने सुद्धा दारूची विक्री केली जाते
महाशिवरात्रीच्या रात्री सुद्धा येथे रात्री एक-दोन वाजे पर्यंत अर्ध शटर उघडे ठेवून मांगाल ती देशी-विदेशी दारूची विक्री केली गेली , असे वृत्त आजच तासाभरा पूर्वी मंडे टू मंडे ने प्रसिद्ध केले होते या पश्वभूमीवर सादर अवैध देशी-विदेशी दारूची विक्री बंद करण्यात आली असून बघूया, पूर्णपणे बंद होते , की पुन्हा सुरू होते.