भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

नकली नोट प्रकरणी रावेर शहरातून ४ जणांना अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : हरदा मध्यप्रदेश येथील नकली नोट रॉकेट प्रकरणाची लिंक रावेर शहरात असल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते, याप्रकरणी आता नकली नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शहरातील आणखी ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडुन ७ हजाराच्या नकली नोटा हस्तगत केल्या आहे.

नकली नोट प्रकरणाच्या तपासात मध्यप्रदेशातील हरदा पोलीस शनिवारी रावेरात येऊन गेले होते शहरातील शेख शकिर शेख हाफिज या आरोपीला पकडले होते यामुळे नकली नोट प्रकरणाची लिंक रावेरात असल्याचे स्पष्ट झाले होते याबाबती माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. यामुळे मध्यप्रदेशातून संबंधीत आरोपीची चौकशी करण्यात आली. रावेर पोलिसांनी सखोल चौकशीअंती आणखी ४ जणांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्याकडून १०० व २०० च्या ७ हजार रुपये किंमतीच्या नकली नोटा हस्तगत केल्या आहे.

याप्रकरणी सोमवारी पहाटे करण्यात आलेल्या कारवाईत नंतर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील शेख शाकीर शेख हाफीज याने मध्यप्रदेशातून सात हजार रूपयांच्या १०० आणि २०० रूपयांच्या बनावट नोटा रावेरात आणल्या होत्या. त्याने या नोटा असलम उर्फ राजू सुपडू तडवी (वय ३० राहणार पाच बीबी टेकडी रावेर) ;सोनू मदन हरदे (वय ३० राहणारा अफुल्ली रावेर); रविंद्र राजाराम प्रजापति (वय ३१ राहणार कुंभार वाडा रावेर) आणि शेख शाकीर शेख साबीर (वय २६ राहणार खाटीक वाडा रावेर) यांना वापरण्यासाठी दिल्या होत्या. यातील शेख शाकीर शेख हाफीज याला आधीच अटक करण्यात आली होती त्याची चौकशी केल्यानंतर शहरातील चारही जणांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल सचिन रघुनाथ घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्थानकात भादंवि कलम ४८९, (ब),४८९(क), ३४ प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!