भाजपा अनुसूचित जाती ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी विकास अवसरमल यांची नियुक्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
ऐनपुर, प्रतिनिधी-इक़बाल पिंजारी: भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव ग्रामीण ची कार्यकारणी तयार झाली असून भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी विकास वामन अवसरमल तर संघटक पदी नागेश्वर साळवे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी तर्फे भाजपा अनुसूचीत जाती मोर्चा जळगाव ग्रामीण जिल्हा कार्यकारणी तयार करण्यात आली होती त्यात जळगाव (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदी माननीय विकास अवसरमल यांची तर जिल्हा संघटक पदी नागेश्वर साळवे यांची नियुक्ति करण्यात आली आहे,याबाबत मानानीय आमदार राजू मामा भोळे ,माजी मंत्री गिरीश महाजन, मा खासदार उन्मेष दादा पाटील,मा. खासदार रक्षाताई खडसे,मा आमदार मंगेश दादा पाटील, मा आमदार संजय सावकारे,रंजनाताई पाटील,सुरेश भाउ धनके, मा नंदूभाऊ महाजन, पद्माकर महाजन तसेच इतर सर्व भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेछ्या दिल्या.