भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्ररावेर

रावेर बोरखेडा हत्याकांड: तीन अटकेत,गृहमंत्री देशमुख उद्या रावेरात– ना. गुलाबराव पाटील

रावेर (विशेष प्रतिनिधी)। रावेर बोरखेडा येथील चार भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून जलदगतीने तपास सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे प्रतिपादन तसेच गृहमंत्री अनिल देशमुख उद्या जिल्ह्यात येत आहेत. असे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील सांगितले. ते पिडीत कुटुंबाची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या रात्री झालेल्या रावेर बोरखेडा येथील हत्याकांड सकाळी उघडकीस आले तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री ना, पाटील हे मुंबईत होते. मुंबईहून परत आल्यानंतर त्यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेतली.या वेळी ना, पाटील यांनी रावेर येथील हे भयानक हत्याकांड हे अतिशय भयंकर असून पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे आता पर्यंत या प्रकरणात तीन संशयिताना अटक केली असून अजून काहींची चौकशी सुरू आहे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचर त्यांनी सांगितले तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून ते उद्या जिल्ह्यात येत असून बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती देखील ना. पाटील यांनी याप्रसंगी दिली. पीडित कुटुंब हे अतिशय गरीब असल्याने त्यांना दोन लाख रुपयांची मदत तातडीने देण्याचे त्यांनी सांगितले तसेच शासनाच्या निकषानुसार त्यांना मदत करण्यात येणार अडल्याची ग्वाही ना , गुलाबराव पाटील यांनी दिली, दरम्यान या हत्याकांड प्रकरणी कायदेतज्ज्ञ ऍड ,उज्वल निकम यांचे मार्गदर्शन घेऊन जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रकरणाची माहिती घेतली असल्याचेही ना, पाटील यांनी सांगितले ,या याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे आदी मान्यवर होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!