भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव पालिकेच्या भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची पात्रतेबाबत नोटीस

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीवेळी भाजपच्या हातावर तुरी देऊन शिवसेनेच्या गळाला लागलेल्या भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्या पात्रतेबाबत येत्या 11 जानेवारी रोजी नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, कोणते नगरसेवक पात्र ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहचलीय.

जळगाव महापालिकेत महापौर, उपममहापौर निवडीच्या वेळी भाजपचे २७ नगरसेवक फुटले होते. त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. यात दिलीप पोकळे यांचाही समावेश होता. बंडखोर नगरसेवकांनी दिलीप पोकळे यांना गटनेते पदी नियुक्त केले. पोकळे यांनी इतर नगरसेवकांना प्रभाग समिती सभापती निवडीत आपला गट हाच भाजप असून आपण दिलेल्या उमेदवारास मतदान करावे असा व्हीप बजावला. मात्र भाजप नगरसेवकांनी तो व्हीप धुडकावून लावला. त्यामुळे दिलीप पोकळे यांनी नगरसेवक सीमा भोळे यांच्यासह २९ नगरसेवकांना अपात्र करावे अशी तक्रार पक्षाचे गटनेते म्हणून नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे केली.

त्याची दखल घेऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी २९ भाजपच्या नगरसेवकांना नोटीस बजावली असून त्यावर ११ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता नाशिक येथे सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी महापलिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनाही उपस्थित राहण्याचे कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!