भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

वाहनांसाठी घरगुती गॅसची विक्री,५ छाप्यात १२ जणांना अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा।। शहरात घरगुती गॅसचा गैरवापर करत वाहनांसाठी विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेसह ३ पोलीस ठाण्यांच्या ५ पथकांनी शाहू नगर , शनीपेठ परिसरात व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ छापे टाकून १२ जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ११ लाख ५६ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हापेठ, शनीपेठ आणि शहर पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शाहूनगरातील शाहूनगर कॉम्लेक्स, ट्राफीक गार्डन परिसर आणि शनीपेठ परिसरात अवैधपणे घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि जिल्हा पेठ पोलीसांनी शाहूनगर ट्राफिक गार्डन येथे शुक्रवारी सकाळी कारवाई केली. घरगुती गॅसची काळ्या बाजारात चोरटी विक्री करत असतांना जाकीर शेख चाँद पिंजारी (वय-४५, रा. काट्या फाईल, शनीपेठ) हा रिक्षा चालक राजेश अर्जून गोपाळ (वय-३८ , रा. समता नगर) यांच्या रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ३०१५) घरगुती गॅस भरतांना आढळून आले. दोघांवर कारवाई करत दोन गॅसचे सिलिंडर , रिक्षा व गॅस भरण्याचे साहित्य असा १ लाख ७८ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्हापेठ पोलीसात जाकीर शेख चांद पिंजारी व रिक्षाचालक राजेश अर्जून गोपाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत शाहू नगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्समध्ये मच्छी बाजारासमोरील वॉलकंपाऊंडच्या भिंतीजवळील एका टपरीत मकसूद अली न्यायज अली सैय्यद (वय-६६, रा. भिस्तीवाडा शाहू नगर) हा देखील घरगुती गॅसचा वापर वाहनांसाठी करत असल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत २० हजार ३०० रूपये किंमतीचे भारत गॅसचे ८ सिलिंडर्स , ६ हजार किंमतीचे डिजीटल काटे आणि १६ हजार रूपये किंमतीचे गॅस भरण्याचे मशिन असा ४३ हजार ३०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला पो ना किरण चौधरी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात मकसूद अली न्यायज अली सैय्यद याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काट्याफाईल येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिसरी कारवाई केली. शेख नदीम शेख रसुल (वय-४०, रा. काट्या फाईल फैज मेडीकलजवळ) हा घरगुती गॅस वाहनांमध्ये भरत असतांना आढळून आल्याने गॅस भरण्याचे साहित्यासह ८३ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जमा केला . चौथा छापा वाल्मिकनगरात टाकून कैलास विलास सोनवणे (वय-४५ , रा. वाल्मिक नगर) आणि सुरज नारायण सोनवणे (वय-३० , रा. गेंदालाल मिल ) यांच्यावर करवाई करत त्यांच्याकडून गॅस भरण्याच्या साहित्यासह २ लाख १० हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पाचवा छापा लेंडी नाल्याजवळ टाकून शुभम राजू बोरसे (वय-२५ , रा. वाल्मिक नगर) , संदीप अरूण चौधरी (वय-२९ , रा.पिंप्राळा गणपती नगर) , अशिफ अब्दुल रहेमान (वय-४६ , रा. फातीमा नगर), किरण शालीक कोळी (वय-२५ , रा. समता नगर ) आणि मोहमंद सलमान गुलाम शाबीद बागवान ( रा. जोशी पेठ ) या पाच जणांवर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील गॅस भरण्याचे साहित्य , डिजीटल काटा आणि गॅसचे सिलिंडर्स असा ६ लाख ४१ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईत शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पवार, पोहेकॉ विकास वाघ, साहेबराव चौधरी, पो.ना. किरण चौधरी, पोहेकॉ कमलाकर बागुल, सुनिल दामोदरे, अनिल देशमुख, पो.ना. किशोर राठोड आदींनी केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!