भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

महसूल विभागावर एसीबीची संक्रांत; लाच घेणाऱ्या तलाठ्यास रंगेहात पकडले

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। अमळनेर तालुक्यातील जवखेडे येथील ,शेतीच्या जागेवर शाळा बांधल्यानंतर तहसीलदारांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदारावर कारवाई टाळण्यासाठी १५ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यास एसीबी पथकाने रंगेहात पकडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांचे अमळनेर तालुक्यातील जवखेडे शिवारात शेत आहे. शेताच्या जागेवर शाळेसाठी बांधकाम केले आहे. तहसीलदार यांनी नोटीस बजावल्यानंतर तक्रारदाराने 32 हजार ४२६ रूपयांचा दंड देखील भरला मात्र त्यानंतरही कारवाई करण्याची धमकी देवून पुढील कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच जावखेड येथील तलाठी मुकेश सुरेश देसले (वय-४५) रा. धुळे यांनी मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागात तक्रार दिल्यानंतर आज दुपारी १२.३० वाजता सापळा रचून १५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना तलाठी देसले याला रंगेहात पकडले.या पूर्वीही तहसीलदार,तलाठी यांचेसह अनेक महसूल विभागाचे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने मोठी खडबड मजली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!