मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदानाच्या दिवशी शाळांना सुटी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांकरीता दिनांक २१ डिसेंबर, २०२१ रोजी मतदान होऊन दिनांक २२ डिसेंबर, २०२१ रोजी मतमोजणी आहे. सदर निवडणूक कार्यक्रमा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमधील ४५ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
तसेच जळगाव जिल्ह्यातील ११ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये दिनांक १८ जानेवारी, २०२२ रोजी मतदान होणार असून दिनांक १९ जानेवारी, २०२२ रोजी मतमोजणी आहे. त्यानुसार ज्या – ज्या शाळांच्या इमारतीमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे. अशा शाळांना मतदानाच्या एक दिवस अगोदर तसेच मतदानाच्या दिवशी याव्दारे सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.