खळबळजनक; पारोळ्यात तरुणीवर सामूहिक बलात्कारानंतर पाजले विष
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील पारोळा येथील एका २० वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर विष पाजून खून केल्याची खळबळजनक घटना घडली असल्याचा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी कडुन करण्यात आला आहे. घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, एका २० वर्षीय दलित तरुणीचे दोन-तीन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. या संदर्भात नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार केली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी पारोळा बस स्थानकाचे मागे पीडित तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले असता तिला काहीतरी विषारी पदार्थ पाण्यात दिलाचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान आज पहाटे उपचारादरम्यान पीडित तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पीडित मुलीवर तीन ते चार जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिला काहीतरी विषारी पदार्थ देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच डॉक्टरांना देखील आम्हाला तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर इतर दोन संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.