सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मोबाईलवर गेम खेळायला नेण्याच्या बहाण्याने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी भैय्या भरत गायकवाड रा. पाचोरा याला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा दंड ठोठावला.
या बाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असणारी ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला ७ मार्च २०१८ रोजी दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास आरोपी भैय्या भरत गायकवाड, वय-२२, रा. पाचोरा या तरूणाने पिडीत मुलीला मोबाईलवर गेम खेळायला चल असे बोलून त्याच्या घरात नेले. त्याठिकाणी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा खटला जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती एस.एन.माने यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षिदार तपासण्यात आले. यात पिडीत मुलगी, तिची आई, तपासी अंमलदार व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. यात आरोपी भैय्या भरत गायकवाड याला दोषी ठरवून न्या. माने यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांन्वये १० वर्षाची सश्रम कारावास आणि ३५ हजार रूपयांचा एकत्रित दंडाची शिक्षा सुनावली आहे. .