भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव गोळीबाराने हादरले : तरुणावर बेछूट गोळीबार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत एम.जे. कॉलेज मागील गुलमोहर कॉलनी परिसरात मीनाताई ठाकरे मार्केट येथे २४ एप्रिल गुरुवारी रात्री १० वाजता एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन आरोपी फरार झाले असून पोलिसांनी संशयित आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे त्याला ताब्यात घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दादू उर्फ महेंद्र समाधान सपकाळे (वय २२, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) हा तरुण पिंप्राळा हुडको परिसरात राहत असून गुरुवारी दि. २४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता तो एम. जे. कॉलेज मागील मीनाताई ठाकरे मार्केट येथे बसला होता. तेथे संशयित आरोपी विशाल कोळी व इतर संशयितांनी रामनवमीला झालेल्या जुन्या वादातून महेंद्र सपकाळे याच्यावर गोळीबार केला. त्यात महेंद्र यांच्या उजव्या बाजूने कमरेखाली गोळी लागली आहे. तर गोळीबार करून संशयित आरोपी फरार झाले.

ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस स्टेशनला
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये अप्पर एसपी अशोक नखाते, डीएसपी संदीप गावित यांनी पाहणी केली. घटना स्थळाजवळ जिवंत गोळी आढळून आली आहे. दरम्यान एलसीबी फरार संशयित आरोपींचा शोध घेत असून शासकीय रुग्णालयातील  प्राथमिक उपचारानंतर दादू सपकाळे याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी उपचारासाठी हलवण्यात आले आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, जखमी व हल्लेखोर हे दोघे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकारांना दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!