भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

ठाकरे गटांचे विस्तारक शरद कोळी पोलिसांना चकवा देत अज्ञात स्थळी रवाना !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी पोलिसांना चकवा देऊन अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. त्यांच्यावर भाषण करण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर त्याना ताब्यात घेण्यासाठी गेले असता कोळी रात्रीच अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आलीय.

सध्या जळगावात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वातील महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी सभेत भाषण करताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रचंड निशाणा साधला होता. यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड तणाव वाढीस लागला आहे.

शरद कोळींनी टीका करताना प्रभोषक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली. याच मुद्द्यावरुन पोलीस जेव्हा शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी ते ज्या हॉटेलवर थांबले होते त्या हॉटेलवर गेले तेव्हा पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये वाद झाला. दरम्यान, पोलिसांचे आदेश झुगारून शहर पोलीस ठाण्याबाहेरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शरद कोळी महापौरांच्या गाडीतून चोपडा येथे महाप्रबोधन सभेकडे रवाना झाले.

यानंतर पोलिसांनी शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी चोपडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडावद येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान चोपडाकडे निघालेल्या सुषमा अंधारे यांच्या ताफ्यातील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. या दरम्यान महापौरांच्या गाडीतून शहर पोलीस ठाण्याहून निघालेले शरद कोळी मात्र चोपड्याच्या सभेकडे न जाता पोलिसांना चकमा देत अज्ञात स्थळी रवाना झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!