भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

धक्कादायक : जळगावातील शिकाऊ डॉक्टर तरुणींची गळफास घेऊन आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या द्वितीय वर्षात एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करीत स्वतःचे जीवन संपविले. तिला कमी मार्क मिळाले म्हणून तिने आत्महत्या केली आहे असी माहिती समोर येत आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयमध्ये एका तरुणाने रॅगिंगच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता जळगावमध्ये देखील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा एक आता चिंतेचा विषय बनला आहे. मयत विद्यार्थिनीचे नाव वैष्णवी किशोर लोखंडे (वय २२) रा.समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज पाठीमागे जळगाव असे आहे. संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला आहे. सीएमओ डॉ. नीता भोळे यांनी तिला तपासून मृत घोषित केले. आज सकाळी तिच्या मृतदेहावर शवविच्छेदन होणार आहे.

वैष्णवी अभ्यासामध्ये हुशार होती. ती नेहमी सर्वांशी मनमिळावूपणे वागायची, असे तिच्या मित्र-मैत्रिणींनी सांगितले. दरम्यान, तिला परीक्षांमध्ये कमी मार्क पडले होते, त्यामुळे ती काहीशी नाराजी होती. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी अशी चर्चा मित्र-मैत्रिणींमध्ये आहे. दरम्यान मुलीने आत्महत्या केल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे. तीचे वडील किशोर लोखंडे हे जळगाव शहरातील महापौर जयश्री महाजन यांच्या या.दे. पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे. याबाबत पुढील तपास रामानंद नगर पोलीस करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!