भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव हादरले : प्रियकराच्या मदतीने आईनेच पोटच्या मुलाला जंगलात नेऊन संपविले !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरात एक धक्कदायक घटना समोर आली असून महिलेने आपल्या अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरलं असलेल्या पोटच्या मुलास गळफास देऊन ठार मारल्याच्या घटना उघडकीस आली असून ती महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केले आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विलास नामदेव पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि मुलगा प्रशांत पाटील यांच्यासह जलाराम नगरात वास्तव्याला आहेत. विलास पाटील हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, त्यांची पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत असल्याने त्याची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष दाखवून प्रशांत याला त्याची आई मंगलबाई आणि प्रमोद हे दोन्ही सोबत घेवून मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर गावानजीकच्या असिरगड जंगलात घेऊन गेले. तिथे पोहचता त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून दिले. तेथून ही महिला पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.

पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय १४, रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे. तर त्यांची आई मंगलाबाई विलास पाटील (वय ३५, रा. जलाराम नगर) आणि प्रमोद जयदेव शिंपी (वय ३८, रा. विखरण ता. एरंडोल) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता पोलीसांनी संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बर्‍हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला. मुलाचा खून करणार्‍या दोन्ही संशयित आरोपींना १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथक करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!