विवाहित तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसंकलंन। चिंचोली येथील ३५ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे, चिंचोली येथिल रहिवासी गणेश गोसावी हा आपल्या पत्नी व दोन मुलांसह हातमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे मंगळवार ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. गणेश गोसावी हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला गेले. दरम्यान रात्री १०.३० वाजता त्यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेतले. ही बाब त्यांची ५ वर्षाची मुलगी परी हिच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली.
नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रतिलाल पवार करीत आहे.