भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

तृतीयपंथीयाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील रामेश्वर कॉलनीतील एका २० वर्षीय तृतीयपंथीयाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, रामेश्वर कॉलनीतील स्मशानभूमीजवळील रहिवाशी विक्रांत उर्फ विक्की उर्फ लैला मनोहर खरकार (वय-२०) या तृतीयपंथीने गुरुवारी रात्री राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विक्कीने गळफास घेतल्याचे त्याच्या कुटुंबियांना दिसताच त्यांनी आक्रोश केला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह खाली उतरवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मयत घोषीत केले.

शुक्रवारी सकाळी मृतदेहाचेशवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्या पश्‍चात आई व लहान भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!