भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

चारित्र्याच्या संशयावरून पतीने घातपात केल्याचा संशय,पतीसह जेठ, सासुसासरे ताब्यात

Monday To Monday NewsNetwork।

जळगांव (प्रतिनिधी)। येथील प्रजापत नगर परिसरातील माहेर असलेल्या वीस वर्षीय विवाहितेने सासरी राधाकृष्णन नगर राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.मात्र हा घातपाताचा प्रकार असल्याचे विवाहितेचे वडील दत्तू पाटील यांनी चारित्र्याच्या संशयावरून पतीने तिचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केल्याने आणि सासरच्या मंडळींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने पती शेखर गायकवाड सासू सासरे व जेठ यांना गुन्हा दाखल करुन आदींना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.

जळगाव येथील प्रजापतनगरात राहणाऱ्या दुर्गा या तरुणीचा विवाह २३ डिसेंबर २०२० रोजी राधाकृष्ण नगरात राहणाऱ्या शेखर गायकवाड या तरुणाशी झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुर्गा गायकवाड या विवाहितेने जळगाव शहरातील दुध फैडरेशन जवळ राधाकृष्णन नगर सासरी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. शेखर गायकवाड यांचे खान्देशी व्हेज नावाचे हॉटेल असून पती-पत्नी दुपारी आरामासाठी घरी येतात. घटना त्याच वेळी घडली असून पतीने तिचा घातपात केल्याचा संशय तिचे वडील दत्तू आधार पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा विवाहितेच्या कुटुंबीयांनी घेतला याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पती शेखर भास्कर गायकवाड, सासरे भास्कर दतात्रय गायकवाड ,सासु वत्सलाबाई भास्कर गायकवाड, जेठ मुकेश भास्कर गायकवाड चौघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!