भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

अर्थसंकाल्पामुळे देशासह प्रत्येक सामान्य नागरिकाला आर्थिक बळकटी मिळेल–खा. रक्षा खडसे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। महासत्तेच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या भारत देशाच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झाले होते. आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पा मधून सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण जाहीर झालेला अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांसाठी नवसंजीवनी देणारा आहे. उद्योग, कृषी, छोटे व्यावसायिक, शेती रोजगार सूक्ष्म सिंचनालये, आरोग्य, गुंतवणूकदार, उद्योग आणि मुलभूत सुविधेद्वारे आत्मनिर्भर भारतासाठी विकास नाविन्यता आणि परिपूर्ण पारदर्शकता असलेला हा सक्षम अर्थसंकल्प आहे. असे प्रतिपादन भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी केले .

अर्थसंकल्पाचे स्वागत असण्यासोबतच करोनाच्या महामारीनंतर आरोग्यधनसंपदा धोरण आचरणात ठेवून नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद जनकल्याणासाठी केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत त्या उल्लेखनीय असून प्रत्येक नागरिकाला नवसंजीवनी देणाऱ्याच आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी २ लाख २३ हजार ८४६ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यासोबतच रस्ते विभागासाठी १ लाख १८ हजार कोटींचा निधी, कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी, शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरिता तरतूद केली आहे. सर्व क्षेत्रात सर्व पदांवर महिलांना नोकरी करता यावी म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहे. आदिवासी भागात ७५० ‘एकलव्य’ शाळा उभारणार. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लहान सिंचन प्रकल्पांसाठी ५ हजार कोटींची तरतूद, डिजिटल जनगणनेसाठी ३ हजार कोटींपेक्षा जास्त तरतूद, देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये जल जीवन मिशन राबवण्यात येणार असून या महत्त्वकांक्षी योजनेसाठी २.८७ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती.लघु उद्योगांसाठी १५ हजार ७०० कोटींची तरतूद आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासाठी १,१८,१०१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शहरांच्या विकासंसोबातच ग्रामीण भागांच्याही विकासाचा पूर्ण विचार सदर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये आहे. ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेसाठी ६४,००० कोटी गुंतवणुकीतून सक्षम आरोग्य व्यवस्था, रेल्वे व राष्ट्रीय महामार्गातून मार्गातून मुलभूत सुविधा, शेती मालाच्या खरेदी तुलनात्मक तक्ता, शेती मालाच्या खरेदी प्रति साकाराचे योगदान दर्शविणारा, ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात जलजीवन मिशन कार्यक्रम गुंतवणूक, रोजगाराभिमुख अर्थसंकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीस वाव देणारा व गुंतवणुकीसाठी प्राधान्य देणारा, शेती, पशुसंपदा मत्स्य संपदा यासाठी मोठो तरतूद करून ग्रामीण युवक व शेतकऱ्यांना दिलासा व शेती व उद्योगांना चालना देणारा, उच्च शिक्षणासोबतच आदिवासी नागरिकांपर्यंत एकलव्य येजानेद्वारे क्रांती करणारा अर्थसंकल्प आहे. भुसावळ ते खडकपूर स्वतंत्र रेल्वे कोरीडोर तयार करण्यात येणार आहे. म्हणून या अर्थसंकल्पाचे स्वागत असून या अर्थसंकाल्पामुळे देशासह प्रत्येक सामान्य नागरिकाला आर्थिक बळकटी मिळेल असा विश्वास आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!