चोरांनी दुकान समजून चक्क मुतारीच फोडली,चोरांच्या पदरी शेवटी निराशा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा।।शिरसोली प्र. बो. मध्ये चोरट्याने दुकान समजून चक्क मुतारी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. घटना उघडकीस आल्यानंतर सगळी एकच हशा पिकला होता.
यासंदर्भात अधिक असे की, शिरसोली प्र.बो. येथील जळगाव पाचोरा रस्त्यावर एस. टी. स्टँडजवळ महिला व पुरुषांसाठी तीस वर्षांपूर्वी मुतारी बांधली आहे. १० रोजी एका चोरट्याने रात्री अंधारात दुकान समजून ही मुतारी फोडली. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून या फोडलेल्या मुतारीची दिवसभर चर्चा होती. दरम्यान, दुकान समजून चक्क मुतारी फोडल्यामुळे चोर नवखे तसेच बालिश असावेत, अशी एकच चर्चा सुरु असून सगळीकडे चोरांच्या मूर्खपणावर गावकरी हसत आहेत