जळगाव जिल्ह्यात आज १९१ कोरोना बाधित रुग्ण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण १९१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४६४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर-३५, जळगाव ग्रामीण-३१, भुसावळ -२४, अमळनेर-२, चोपडा-२५, पाचोरा-१७, भडगाव-०, धरणगाव-३, यावल-४, एरंडोल-४, जामनेर-७, रावेर-९, पारोळा-१, चाळीसगाव-२१, मुक्ताईनगर-५, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १९१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५० हजार ५२९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४५ हजार ६४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५८६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या २ हजार ३०० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत.