भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जळगाव जिल्ह्यातील २६ प्रभारी पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्य पोलीस दलातील काही अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील २६ विविध पोलिस ठाण्यांच्या प्रभारी पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी काढले आहेत.

काही दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.त्यानंतर आता पोलीस निरिक्षक आणि सहायक पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.खालील प्रमाणे बदल्या करण्यात आल्या. अशा झाल्या बदल्या?
१) शनिपेठचे प्रभारी असणारे निरिक्षक विठ्ठल ससे यांची पोलीस निरिक्षक सुरक्षा शाखा प्रभारी येथे बदली झाली आहे.
२) भुसावळ शहरचे निरिक्षक बाळासाहेब बाजीराव ठोंबे यांची जिविशा शाखा जळगाव प्रभारी येथे बदली करण्यात आली आहे.
३) भुसावळ तालुका पोलीस स्थानकातील रामकृष्ण महादू कुंभार यांची जळगाव तालुका स्थानकात प्रभारी निरिक्षकपदी बदली झाली आहे.
४) रावेर पोलीस स्थानकाचे रामदास वाकोडे यांची जिल्हापेठ पोलीस स्थानकात निरिक्षकपदी बदली झाली आहे.
५) चाळीसगावचे प्रभारी विजयकुमार नरसिंहराव ठाकूरवाड यांची जळगाव शहर पोलीस स्थानकात बदली झाली आहे.
६) जामनेरचे प्रताप विश्‍वनाथ इंगळे यांची भुसावळ शहर पोलीस स्थानकात निरिक्षकपदी ट्रान्सफर झाली आहे.
७) शहर वाहतूक शाखेचे देविदास मधुकर कुनगर यांची चोपडा ग्रामीण येथे बदली झाली आहे.
८) पोलीस नियंत्रण कक्षातील किरण बाजीराव शिंदे यांची जामनेर स्थानकात बदली झाली आहे
९) बुलढाणा येथील कैलास नागरे यांची रावेर पोलीस स्थानका बदली झाली आहे.
१०) बीडीडीएस नाशिक शहर येथील विजय फकीरराव शिंदे यांची रामानंदनगरला बदली झाली आहे.
११) वाशीम येथील शंकर विठ्ठल शेळके यांची धरणगाव पोलीस स्थानकात बदली झाली आहे.
१२) नाशिक ग्रामीण येथील कांतीलाल काशिनाथ पाटील यांची चाळीसगाव शहरला बदली झाली आहे.
१३) धरणगाव येथील अंबादास शांताराम मोरे यांची जळगाव येथील मानव संसाधन शाखेत बदली झाली.
१४) जिल्हापेठचे विलास वसंत शेंडे यांच्याकडे आता भुसावळ तालुक्याचा प्रभार असणार आहे.
१५) सुरक्षा शाखेतील दिलीपसिंह मांगो पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली झाली.
१६) नियंत्रण कक्षातील लिलाधर नारायण कानडे यांच्याकडे आता जळगाव शहर वाहतूक शाखेची जबाबदारी आली आहे.
१७) सायबर पोलीस स्थानकाचे बळीराम हिरे यांची शनिपेठला बदली झालेली आहे.
१८) संतोष नारायण भंडारे यांच्याकडे आता पारोळा स्थानकाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे.
१९) मानव संसाधन विभागातील अरूण काशिनाथ धडवडे यांच्याकडे पहूर स्थानकाची जबाबदारी आली आहे.
२०) भुसावळ बाजारपेठचे सपोनि अनिल छबू मोरे यांच्याकडे नशिराबादची जबाबदारी आली आहे.
२१) एलसीबीचे सपोनि सिध्देश्‍वर हेमंत आखेगावकर यांच्याकडे फैजपूर स्थानकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
२२) पिंपळगाव हरेश्‍वरच्या सपोनि निता कायटे यांच्याकडे कासोदा पोलीस स्थानकाची जबाबदारी आली आहे.
२३) बाजारपेठचे सपोनि कृष्णा भोये यांना पिंपळगाव हरेश्‍वरची जबाबदारी मिळाली आहे.
२४) एमआयडीसीतील सपोनि जयेश खलाणे यांना मारवड स्थानकाची जबाबदारी मिळाली आहे.
२५) पहूरचे सपोनि स्वप्नील नाईक यांच्याकडे भुसावळ शहर वाहतूक शाखेची जबाबदारी असेल.
२६) नाशिक येथून येणारे आशिषकुमार आडसूळ यांच्याकडे वरणगावची जबाबदारी मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!