भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगावात दोन गटात हाणामारी : पोलिसांवर दगड फेक !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथिल खंडेराव नगर भागात असलेल्या आझाद नगर भागात शनिवारी मुलीची छेड काढण्यावरून रात्री दोन गटात हाणामारी झाली. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता, पोलिस दाखल झाले होते.

शहरातील खंडेराव नगर परिसरात असलेल्या आजाद नगर भागात आज सायंकाळी शनिवारचा बाजार होता. बाजारात एका मुलीची छेड काढल्यावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास वाद झाला. एक गट दुसऱ्या गटाला जाब विचारायला गेला असता दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. आणि काही वेळातच दगडफेक करण्यात आली.

काही वेळातच वाद वाढल्याने दोन्ही कडील गट आमनेसामने येऊन दगडफेक सुरू झाली. या घटनेत एक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील तोडफोड केली. घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक पोहचले असून संशयितांची धरपकड करण्याचे काम सुरू असून रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!