एसटी महामंडळातील कामगार सेनेचे राज्यातील दोन महत्वपूर्ण पदे जळगावला..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। एसटी महामंडळातील कामगार सेनेचे दोन महत्त्वपूर्ण पदे जळगाव विभागाला प्राप्त झालेले आहेत. याची अधिकृत घोषणा खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई येथे केली. सद्यस्थितीत जळगाव आगारात कार्यरत सेनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख गोपाळ पाटील यांची यंदाही याच पदावर नियुक्ती करण्यात आलेली असून जळगाव विभागाचे सचिव आर के पाटील यांची राज्य चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकुशलतेमुळे दुहेरी पदे दिलीत
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जळगाव विभागातील आर के पाटील यांनी नियमितपणे कागदोपत्री पाठपुरावा केल्यामुळे व एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपाळ पाटील यांनी केलेल्या कार्यकुशलते मुळे व कामगिरीमुळे या दोघांना राज्यस्तरीय पदावर नियुक्ती देण्यात आलेली असल्याचे कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी कळविले आहे. दादर येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.