जळगाव जिल्ह्यात आज दोन रुग्ण कोरोना बाधित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात अहवालानुसार दोन बाधित रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात जळगाव शहरातून एक तर जळगाव ग्रामीणमधून एक असे दोन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ५१० कोरोना बाधित रूग्ण आढळले त्यापैकी १ लाख ४८ हजार ९०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर आतापर्यंत २ हजार ५९१ कोरोना बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १९ बाधित रूग्ण उपचार घेत आहे.