भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

दुचाकीं एकमेकांवर अदळल्या : उपचारादरम्यान महिलेचा मृत्यु !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्यानंतर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या महिलेसह पती व मुलगा दुचाकीने येत असताना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता नशिराबाद गावाजवळ हा अपघात झाला होता.

भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे अनघा पाटील ह्या पती विनय पाटील, मुलगा कियान यांच्यासह माहेरी गेल्या होत्या. परत येताना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नशिराबाद गावाजवळ एका भरधाव दुचाकीस्वाराने विनय पाटील यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात तिघे जखमी झाले होते. अनघा पाटील ह्या रस्त्यावर अादळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विनय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दुचाकीचालकाच्या विरुद्ध नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!