नात्याला काळीमा ! अल्पवयीन भाचीवर चाकूचा धाक दाखवत मामाचा अत्याचार
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन भाचीवर नराधम मामाने चाकूच्या धाकावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जळगावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, शहरात रहिवासास असलेली मध्यप्रदेशातील मूळ रहिवाशी असलेली एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह शहरातील एका भागात राहते. राजाराम बारेलाल कुंजाम, रा. कोल्हे हिल्स गॅस गोडावून जळगाव याने आठ दिवसांपुर्वी तिचा मामा नात्याने भाची असलेल्या या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला. तसेच कुणाला सांगितले तर तीला जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली या प्रकरणी राजाराम कुंजामच्या विरोधात पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला रात्रीच अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.