भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

Breaking News | रावेरात कोट्यावधीचा ब्राऊन शुगर जप्त : गुन्हे शाखेची मोठी कारवाई

रावेर, प्रतिनिधी : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने रावेर शहरातून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आज शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन महिलांकडून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींचे किमत असलेले सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार साडे तीन किलो वजनाची कोट्यावधी रुपयांची ब्राउन शुगर जप्त केल्याची माहिती मिळत असून परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक केल्या असून संशयीताकडील प्रतिबंधीत ड्रग्ज ब्राऊन शुगर असल्याची माहिती मिळत आहे.

जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वात पथकाला संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन महिला ब्राउन शुगर घेऊन रावेरात डिल करत असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती, त्यानुसार मागावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दोन संशयित महिलांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली आहे. यंत्रणेकडून जप्त ब्राऊन शुगरची मोजणी सुरू असून अंदाजे साडे ३ किलो वजनाची ड्रग असल्याची शक्यता असून सायंकाळपर्यंत रावेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत असून दुपारी उशिरापर्यंत तपास सुरू असून घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले, रावेर पोलीस निरीक्षण कैंलास नागरे, तहसीलदार उषाराणी देवगुणे सह अधिकारी या ठिकाणी हजर झाले आहे.

(बातमी आताच ब्रेक झाली असून वाचकांना बातमी लवकर व तात्काळ देण्याचा आमचा प्रयत्न असून सविस्तर वृत्त थोड्याच वेळात अपडेट करत असून पेज रिफ्रेश करत रहावे)

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!