रावेर पंचायत समिती कनिष्ट सहाय्यक निलंबीत
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर (प्रतिनिधी)। सतत गैरहजर व काम चुकार पणा केल्याने रावेर येथील पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक सलीम तडवी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी आठ ग्रामसेवकांविरुद्ध कारवाई केल्यानें खळबळ उडाली होती, या नंतर रावेरात झालेल्या कारवाईने आणखी खळबळ उडाली आहे. रावेर पंचायत समितीतील कनिष्ठ सहा.सलीम तडवी हे कार्यालयात सतत गैरहजर व माहिती अधिकार अपील विहित कालावधीत बजावले नाहीत.निकाल वेळोवेळी लावले नाही. समाज कल्याण योजनेचे प्रस्ताव मंजुरी करिता पाठवले नाहीत. त्याबाबत गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.त्या अनुषंगाने सलीम तडवी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यांना या काळात एरंडोल पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.