विनापरवाना १ लाख ११ हजाराचा विदेशी दारूचा साठा हस्तगत: तीन जण ताब्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
वरणगाव (प्रतिनिधी)। वरणगाव पोलीस रात्री राष्ट्रीय महामार्गावर वाहनाची तपासणी करीत असताना एका ओमनी वाहनातुन विना परवाना विदेशी दारूची वाहतूक करतांना आढळून आली. यात १ लाख ११हजाराची दारू जप्त करण्यात आली
या बाबत अधिक माहिती अशी की,राष्ट्रीय महामार्गावरील वरणगाव ते मुक्ताईनगर रोडवर वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रात्रीची गस्त घालीत असताना रोडवरील जय बजरंग ढाब्याजवळ रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास सिल्वर रंगाच्या ओमनी वाहनाची पोलीसांनी चौकशी करून तपासणी केली या तपासणी वाहनामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्याने दारू वाहतूकीचा परवाना आहे का अशी पोलीसांनी सदरील व्यक्तीला मविचारणा केली असता वाहन चालक संतोष नारायण जैसवाल यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन त्याच्याकडे कुठलाही दारू वाहतुकीचा पुरावा नसल्याने विना परवाना वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने जैसवाल आणि त्याचे साथीदार दिनेश मनोहर माळी आणि रविंद्र गायकवाड यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्या ओमनी वाहनात असलेला १ लाख १० हजार ९२० रूपये किंमतीचा विदेशी दारूचा साठा आणि वाहन पोलीसांनी जप्त केले आहे. वरणगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक नितीन गणपुरे हे करीत आहेत.