जळगाव पुन्हा हादरले, जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बुधवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता जळगाव पुन्हा एकदा खुनाच्या खळबळजनक घटनेने हादरले आहे. एका ३६ वर्षीय तरुणाचा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला असताना १० ते १२ अज्ञात मारेकऱ्यांनी येऊन चॉपरने ७ ते ८ वार करून त्याची निर्घूण हत्या केली. या वेळी हॉटेलमध्ये मोठी खळबळ उडाली.
किशोर अशोक सोनवणे (कोळी, वय ३६, रा. कोळी पेठ, बालाजी मंदिराच्या मागे, जळगाव. हा गुरुवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता त्याचा मित्र अमोल सोनार उर्फ गंपू व इतर तीन चार मित्रान सोबत कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता. तेथे जेवण करीत असताना अज्ञात १० ते १२ चार इसम आले आणि त्यांनी किशोर कोळी यांच्याशी पूर्व वैमनस्यातून वाद घातला. त्यानंतर यातील तीन ते चार जणांनी किशोर सोनवणे – कोळी याच्यावर चॉपरने सात ते आठ वार करून त्याची निर्घुण हत्या केली.यावेळी हॉटेलमध्ये पळापळ झाली. मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाले. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.
शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी अमोल उर्फ गंपू सोनार याला शनिपेठ पोलीस स्टेशनला नेले असून पुढील माहिती त्याच्या जवळून घेत आहेत. दरम्यान पाच ते सहा महिन्यांपूर्वी मयत आणि मारेकरी यांच्यामध्ये काही वाद झाले होते व त्या वादातूनच ही हत्या झाली असावी अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. मयत किशोर सोनवणे (कोळी) यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे देण्यात आला आहे. मयत किशोर सोनवणे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.